मला काय करावं ते सुचेना. मी जुळवून आणल्याप्रमाणं सगळं झालं होतं खरं. तिला चिठ्ठी मिळाली होती आणि त्याप्रमाणं ती इमानदारीत आलीसुद्धा होती. बहिणीला तिला कदाचित आणायला लागलं असणार. ती निघताना बहिणीनं हट्ट धरला असेल, कदाचित आईच घेऊन जा म्हणाली असेल, कदाचित तिनंच सोबत म्हणून आणलं असेल. पण आता बोलायचं कसं हा प्रश्न होता. ती आल्या आल्याच मी बोललो असतो तर गोष्ट वेगळी होती. आता जर जाऊन बोललो तर तिच्या बहिणीनं नक्कीच डाऊट खाल्ला असता. ती लहान असली तरी तिला तेवढं कळणारच.
मी काय करावं न कळून नुसता बसून राहिलो. आम्ही एकमेकांकडे मधून मधून बघत होतो आणि ती बहिणीशी बोलण्यात गुंग आहे असं दाखवत असली तरी तिचं लक्ष माझ्याकडे होतं हे मला माहीत होतं. पण वेळ फुकट जात होता. एवढं सगळं जमवून आणून काही बोलणंच नाही म्हणजे काय? परत अशी संधी कधी येणार? मला आतल्या आत खूप अस्वस्थ व्हायला होत होतं.
मग बराच वेळ असा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते असं बसणंसुद्धा खूप छान होतं. त्या बाहेरच्या मंडपालाही स्वच्छ, गार काळी फरशी होती. फुलांचा आणि उदबत्त्यांचा सुंदर वास दरवळत होता. मधून मधून घंटा वाजत होत्या. सगळे लोक कसे स्वच्छ आंघोळी करून चांगले चांगले कपडे घालून आले होते. सगळं वातावरण कसं आनंदी आणि पवित्र होतं आणि मुख्य म्हणजे त्या मंडपात शिरोडकर होती. माझ्यापासून लांब बसलेली. पण तिच्या आणि माझ्यामध्ये काही तरी होतं. सोनेरी आकाशगंगेसारखं. आणि ते जे होतं त्यानं आम्हांला दोघांना बांधून घेतलं होतं. आणि ते इतर कुणालाच दिसत नव्हतं. तिच्या बहिणीला, आजूबाजूच्या माणसांना, कुणालाच नाही. फक्त आम्हांलाच दिसत होतं ते आणि तिथल्या त्या देवांना. ते आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असणार आणि न मागताही आशीर्वाद देत असणार. आणि ते काही तरी होतं हे मला उशिरानं कळलं, पण शिरोडकरला आधीच कळलं असणार. म्हणून ती शांतपणे बसली होती. नुसती मंद मंद हसत.
मग मला कळलं की, आम्ही जे शोधतोय ते हे आहे. ते जे आमच्या दोघांमध्ये न बोलता भरून राहिलं होतं ते. आम्ही सगळेच ते शोधत होतो ते. मी, सुऱ्या, फावड्या, चित्र्या, आंबेकर, सुकडी, नरूमामा. आम्हांला सगळ्यांना पाहिजे होतं ते हेच. त्याला काय म्हणतात ते मला माहीत नव्हतं. पण त्याची काही गरज नव्हती. ते मला सापडलं होतं आणि तिलाही. मग पूर्वी कधीही पाहिला नव्हता असा आनंद माझ्या मनात भरून आला. मला खूप सुंदर वाटलं. पवित्र. भाग्यवान. म्हणून मग थोड्या वेळानं त्या दोघी उठल्या आणि फाटकाकडे चालू लागल्या तेव्हा मी शांतपणे त्यांना जाऊ दिलं. ती फाटकातून जाताना मागे वळून पाहील हे मला माहीत होतं. तसं तिनं पाहिलंच. तिला लांबून दिसलं नसणार, पण मी समजूतदारपणे फक्त हसलो.
पुस्तक - शाळा
लेखक - मिलींद बोकील
मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनुदिनीद्वारे मराठीतील लेखक वा कवींच्या साहित्यकृतींचा - मग त्यात पुस्तके, लेख, कविता, नाटके, भाषणे, समीक्षा, नाट्यछटा सारे आले; मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न राहील.
Thursday, November 13, 2008
Friday, June 27, 2008
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ ...........
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी
Tuesday, May 13, 2008
तुझ्या डोळ्यात पाणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
माझ्या ओठांवर आज
आठवांची गाणी
एक क्षण तुझा
एक क्षण माझा
त्या नाजूक क्षणांची
बाकी राहिली देणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक डाव तुझा
एक डाव माझा
त्या आपल्या खेळाची
अधुरी कहाणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक स्वप्न तुझं
एक स्वप्न माझं
त्या गुलाबी स्वप्नांची
भंगलेली लेणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक सूर तुझा
एक सूर माझा
त्या गंधर्व गीताची
झालीय विराणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
.......Orkut
माझ्या डोळ्यात पाणी
माझ्या ओठांवर आज
आठवांची गाणी
एक क्षण तुझा
एक क्षण माझा
त्या नाजूक क्षणांची
बाकी राहिली देणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक डाव तुझा
एक डाव माझा
त्या आपल्या खेळाची
अधुरी कहाणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक स्वप्न तुझं
एक स्वप्न माझं
त्या गुलाबी स्वप्नांची
भंगलेली लेणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक सूर तुझा
एक सूर माझा
त्या गंधर्व गीताची
झालीय विराणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
.......Orkut
Tuesday, May 6, 2008
फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले ,
धावत आठवणींच्या पाठीसबंध आयुष्य वाट पाहत ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्या येण्याची वाट पाहत ,
शब्द गोठले आज ओठीमनात दुखाचे भास कळवले,
मी फक्त तुझ्या साठीजगलो असा की मी ,
जगणे राहून गेले पाठीडोल्यातील अश्रू मनात कोंडाले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्यासमोर झुकते मन ,
हे मन ही आहे फार हाटीयाच हा टी मुळे आयुष्य बेतले,
मी फक्त तुझ्याचसाठीनशीबाची झगडत झगडत ,
न तोडता प्रेमाची गाठहीत्या गाठही संभाळुन ठेवली,
मी फक्त तुझ्यासाठीएक एक क्षण तुझ्या प्रेमाचा ,
आज डोळ्यात दातित्या क्षणाना उराशि कवतावले ,
मी फक्त तुझ्यासाठीअंधार विजत उजेड यावा ,
भान विसरून जुलावी मिठीयाच स्वप्नं ना आयुष्य समजले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझीच वाट पाहत ,
जळाले मन प्रेमसाठीभिन्न दिशाना झुरत राहिलो,
मी फक्त तुझ्यासाठी
धावत आठवणींच्या पाठीसबंध आयुष्य वाट पाहत ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्या येण्याची वाट पाहत ,
शब्द गोठले आज ओठीमनात दुखाचे भास कळवले,
मी फक्त तुझ्या साठीजगलो असा की मी ,
जगणे राहून गेले पाठीडोल्यातील अश्रू मनात कोंडाले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्यासमोर झुकते मन ,
हे मन ही आहे फार हाटीयाच हा टी मुळे आयुष्य बेतले,
मी फक्त तुझ्याचसाठीनशीबाची झगडत झगडत ,
न तोडता प्रेमाची गाठहीत्या गाठही संभाळुन ठेवली,
मी फक्त तुझ्यासाठीएक एक क्षण तुझ्या प्रेमाचा ,
आज डोळ्यात दातित्या क्षणाना उराशि कवतावले ,
मी फक्त तुझ्यासाठीअंधार विजत उजेड यावा ,
भान विसरून जुलावी मिठीयाच स्वप्नं ना आयुष्य समजले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझीच वाट पाहत ,
जळाले मन प्रेमसाठीभिन्न दिशाना झुरत राहिलो,
मी फक्त तुझ्यासाठी
Subscribe to:
Posts (Atom)