लग्न लग्न म्हणजे काय असत?
त्याच्या मनातील विचारांचे
तिच्या चेहरयावर प्रतिबिम्ब असत.
तिच्या प्रश्ना आधी त्याच
उत्तर तयार असत.
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळत,
तिला लागताच ठेच त्याच मन रडत.
तिने चहा केला की त्याला सरबत हव असत,
त्याने गजरा आणला की नेमक तिला फूल हव असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
कधी समझौता तर कधी वाद असतं,तो चिडला तर तिने शांत रहायच असतं.
एकाने विस्कटल,तरी दुसरयाने आवरयाच असत.
संकटाला दारातच थोपवायाच असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
प्रेमाच ते बंधन असत,
घराच ते घरपण असत,
विधात्याला पडलेले,
ते एक सुन्दर स्वप्न असत...
No comments:
Post a Comment