लग्न लग्न म्हणजे काय असत?
त्याच्या मनातील विचारांचे
तिच्या चेहरयावर प्रतिबिम्ब असत.
तिच्या प्रश्ना आधी त्याच
उत्तर तयार असत.
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यात पाणी तरळत,
तिला लागताच ठेच त्याच मन रडत.
तिने चहा केला की त्याला सरबत हव असत,
त्याने गजरा आणला की नेमक तिला फूल हव असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
कधी समझौता तर कधी वाद असतं,तो चिडला तर तिने शांत रहायच असतं.
एकाने विस्कटल,तरी दुसरयाने आवरयाच असत.
संकटाला दारातच थोपवायाच असत.
लग्न लग्न म्हणजे काय असत?
प्रेमाच ते बंधन असत,
घराच ते घरपण असत,
विधात्याला पडलेले,
ते एक सुन्दर स्वप्न असत...
मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनुदिनीद्वारे मराठीतील लेखक वा कवींच्या साहित्यकृतींचा - मग त्यात पुस्तके, लेख, कविता, नाटके, भाषणे, समीक्षा, नाट्यछटा सारे आले; मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न राहील.
Friday, December 3, 2010
Tuesday, November 30, 2010
झोप म्हणजे काय रे भाऊ ???
Normal माणसाची सरासरी झोप ८ तास असते असे मी कुठेतरी वाचले होते. माझी सरासरी झोप ५ तास सुद्धा नाही. याचा अर्थ असा नाही की मी Normal नाही पण एकंदरीत झोप ही इतर अनेक स्त्रिलींगी गोष्टींप्रमाणे माझ्यापासून लांब लांब पळणारी गोष्ट आहे येवढं मात्र नक्की.
माझ्या तरुणपणीच्या काही चुकांमुळे सध्या सध्या माझ्यावर कमी झोप घेण्याची वेळ आलेली आहे हेही तितकेच खरे. नाही नाही... तुम्ही काहीतरी भलताच विचार करुन तुमच्या सुपिक डोक्याला जास्त ताण देऊ नका. त्या चुका म्हणजे "माझे Engineer होणे" आणि मला हा असला "Night Shift वाला Job मिळणे" या आहेत बाकी काही नाही.
झोपेची Definition सांगते की "Sleep is a physical and mental resting state in which a person becomes relatively inactive and unaware of the environment", पण हेही माझ्या झोपेच्या बाबतीत लागू पडत नाही. मी झोपेत सुद्धा कधी inactive आणि unaware नसतो. पाहुण्यांमधे झोपेवरुन कधी गप्पा निघाल्या की माझी आई अजुनही कौतुकाने(?) सगळ्यांना सांगते की "आहो हे तर काहीच नाही. आमचा कार्टा तर चक्क Cricket खेळायचा झोपेत." माझे 'झोपेतले Cricket' पाहुनच कदाचित आई ने मला प्रत्यक्ष Cricket खेळताना पाहायचे धाडस कधी केले नाही. अर्थात तेव्हाच तिने 'OUT' म्हणुन किंवा "तुला Indian Cricket Team मधुन काढुन टाकलेले आहे" असे सांगुन माझी ही सवय घालवली असती तर मी झोपेत का होईना पण दुसरेही काही खेळ खेळलो असतो. पण मला अजुनही नक्की आठवतंय की मी झोपताना जसा स्वत:ला डोक्यापासुन पायापर्यंत पांघरुणात गुंडाळुन घेऊन झोपायचो, सकाळी ऊठताना पण मी त्याच अवस्थेत असायचो.. असो.. आई कशाला खोटे बोलेल???
सांगायचा मुद्दा हा की, मी जे काही ४/५ तास झोपतो त्यातही किमान ३/४ वेळा मला जाग येते. आणि तीही क्षुल्लक कारणांवरुन. जसे कुणी पंखा १ वरुन २ वर केला की, कुणी आत कोण झोपलाय हे दाराचा कर्रकर्र आवाज करत बघुन गेलं की, किंवा कुणी मला ओलांडुन जाताना पाय आणि डोके नक्की कुठल्या दिशेला आहे हे न समजल्याने माझ्या पोटावरुन जाताना कांदाफोडणी खेळुन गेले की वगैरे वगैरे.. प्राण्यांशी तुलना केल्यास माझ्याएवढी झोप घेणाऱ्यांमधे गाढवाचा नंबर लागतो. पण हा निव्वळ योगायोग असावा कारण रोज ८ तास तरी झोप घेणाऱ्या तुमच्यासारख्यांच्या जोडीला प्राण्यांमधुन माकडाचा नंबर लागतो... असो...
अच्छा जी माणसे झोपेत घोरतात ती खुप सुखी असतात असेही मी ऐकलय. पण मला वाटते की असे काही नसते आणि एक तर त्यांच्या नाकात काही तरी Problem असतो म्हणुन ते घोरतात किंवा त्यांना दुसऱ्या लोकांना त्रास द्यायला खुप आवडत असते म्हणुन ते घोरतात. तुमच्याबद्दल नाही हो, मी आपले 'in general' सांगतोय. "मी झोपेत घोरत नाही" असे मी कुणाला अभिमानाने सांगायला गेलो तर लगेच पलिकडुन "अरे, जे लोक दिवसभर खुप काम करुन दमलेले असतात तेच रात्री घोरतात... तुला ना काम ना धाम तु कशाला घोरशिल" असे तिरकस टोमणे ऐकावे लागतात.
असे नाही की मला कधी शांत, भरपुर झोप मिळालीच नाही. आयुष्याची २ महत्त्वाची वर्षे मी निव्वळ लोळून वाया घालवली आहेत. १० वी आणि १२ वी. शाळेत, क्लासमधे, कॉलेजमधे झोपुन झोपुन मी खुप दमायचो आणि त्यामुळे मला रात्री पण छान झोप यायची. संध्याकाळी नदीकाठच्या बागेतल्या पारावर बसुन 'पक्षी-निरीक्षण' करणे हाच काय तो विरंगुळा असायचा तेव्हा. गेले ते दिवस...
पुस्तक वाचायला सुरु केले की मला हमखास झोप यायची. आणि यात माझा काही दोष नसुन असलाच तर तो रटाळ Syllabus छापणाऱ्या पाठ्यपुस्तक महामंडळाचा आहे असे माझे ठाम मत होते. मला हातात पुस्तक घेऊन बसलेले उर्फ झोपलेले पाहुन आई काहिही न बोलता सरळ दिवा बंद करुन जायची आणि अचानक अंधार झाल्याने जाग येऊन मग मला Embarrassment की काय म्हणतात तसले व्हायचे. बाबा म्हणायचे की "अरे झोप येत असेल तर गणिते सोडवत बस." आता त्यांना कोण सांगणार की मला ती 'क' गट 'ड' गट वाली गणिते सुटली असती तर मी बोर्डात येण्याची आशा सोडली असती का? "अभ्यास करुन कोण शिपाई झालाय" अशी समजुत करुन घेऊन १२वी नंतर निमुटपणे दुकानात गल्ल्यावर बसण्याचेच मी नक्की केले होते. पण झाले मात्र वेगळेच.. छ्या..
Hostel ला राहायला गेल्यावर तर झोपेनं माझ्याकडे पाठच फिरवली. गावगप्पा मारुन झाल्या की मग रात्री ३,४ ला झोपुन सकाळी निवांतपणे ऊठायचे आणि जमले तर ३ऱ्या, ४थ्या Lecture ला जायचे असा खास प्लॅन आमचा रूम पार्टनर ६ चा अलार्म, घसा/नाक साफ़ करणे कार्यक्रम, बादलीचे वाद्यसंगित आणि नंतर पूजेच्या वेळी घंटेची टिणटिण ईत्यादी प्रकार करुन ऊधळुन लावायचा. एक वेळ रात्री बरोब्बर माझ्याच कानाशी गुणगुण करणारे डास परवडले पण याच्या घंटेची टिणटिण नको असे व्हायचे कधिकधि पण तो नंतर Canteen ला गेलो की रोज आम्हाला चहा, पोहे, बटाटावडा खायला घालायचा त्यामुळे आम्हाला दया येऊन आम्ही त्याच्या त्या 'झोपमोडु' चाळ्यांकडे दुर्लक्ष करायचो.
मी काही दिवसांपुर्वी माझ्या कमी झोपेविषयी एका होवु घातलेल्या आणि लवकरच ज्याच्यामुळे कित्येक पेशंट्स चा जीव धोक्यात येणार आहे अशा माझ्या Doctor मित्राचा सल्ला घेण्याची चुक केली. मला नक्की काय होतंय हे पुर्ण न ऐकताच "साल्या, तुला ४ तास तरी झोप मिळतीय, मला साधी २ तास पण नाही मिळत या पेशंट्स मुळं" असे ऐकवुन माझ्या तोंडाला टाके घातले. नंतर "तु पण माझ्यासारखंच झोपेच्या गोळ्या घेणे चालु कर" असा एक जालिम उपायही सुचवलान त्यानं.. तो बोलता बोलता झोपल्यावर मी तिथुन तडक निघालो आणि पुन्हा कुठल्याही नव्या Doctor कडे पण गेलो नाही.
तसं पाहायला गेलं (शब्दश: नाही) तर इतरही काही दैनिक गोष्टी ठराविक वेळी माझ्याकडुन होत नाहीत, त्याकरीता बऱ्याच वेळा मला 'विशेष प्रयत्न' करावे लागतात. झोप ही पण आता त्यातलीच एक गोष्ट झालेली आहे. तात्पर्य हेच की "माझ्या झोपेची झोप सध्या पार उडालेली आहे..."
ठिक आहे तर मग मित्रांनो, मैत्रिणिंनो आता बास करतो हे 'झोप-पुराण'. सकाळचे १० वाजलेत आणि चक्क मला खुप झोप येतीय. तुम्हा सर्वांना यापुढेही उत्तम झोप मिळो, छान छान स्वप्ने पडोत हीच निद्रादेवतेच्या चरणी प्रार्थना. मलाही जरा झोप मिळो, कमी भयानक स्वप्ने पडोत, आणि लवकरच 'जवळजवळ' झोपण्याची संधी लाभो यासाठी तुम्हीही प्रार्थना करालच. Good Night.. oops... Good Day...
(तेवढ्यात...)
टिंगटिडींग टि टिंगटिडींग टी टिंग टिंग टिंग ("मुझको निंद आ रही है सोने दो" च्या चालीवर)
"Hello!!! yes sir... not really sir... Conference call at 12 ???... Ammmm... no problem sir...!!!"
घ्या... वाजले माझ्या झोपेचे १२ !!!

गोष्टी माणसांच्या
तो तसा ऊंचीने बेताचाच,पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचा.त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात शिकणारी मुलं त्याच्याकडे शंका घेऊन येत.भौतिकशास्त्र आणि गणित हे त्याचे आवडते विषय....
तो तसा गरीब घराण्यातला,पण घराणं सुशिक्षीतांच होतं,त्याचे वडील व्यवसायाने शिक्षक होते..
त्याच्या वर्गातील सर्वच मुले कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक होती.त्यातल्या त्यात बुद्धीमान मुलं ही IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत.आपल्या मित्रांबरोबर हयानेही IIT च्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला.ह्या मुलांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं किंवा फ़ारशी पुस्तकही नव्हती त्यांच्या जवळ.म्हैसूर गावातल्या एका दगडी मंडपाखाली असलेल्या सावलीत ही सर्व मुलं बसायची अभ्यास करतं.सगळ्या मुलांना मार्गदर्शन करण्याचा काम्ही ह्याचच होतं.सगळी मुलं प्रश्न्पत्रिकेमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत ;पण ते सर्व प्रश्न हा मात्र लीलया सोडवून द्यायचा! कधीतरी तो एकटाच झाडाच्या सावलीत बसून IIT त शिक्षण घेण्याची स्वप्न बघायचा.त्या वेळी तो फ़क्त सोळा वर्षाचा होता.
प्रवेश परीक्षेचा दिवस,तो नातेवाईकांकडे बंगलोरला आला होता.परीक्षा संपल्यावर नातेवाईकांनी त्याला विचारलं ,"काय रे,कशी गेली परीक्षा ??"
त्यावर तो म्हणाला "ठीक होती.."
यथावकाश त्या प्रवेशपरीक्षेचा निकाल लागला.त्याने त्यात सतरावा क्रमांक मिळवला होता.कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण !!!! त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता.तो आपल्या वडीलांकडे गेला.ते वर्तमानपत्र वाचत बसले होते.
"अण्णा,मी सतरावा आलो."
"अरे वा ! फ़ारच छान..पोरा"
"मला IIT त जायचयं.."
त्याचे वडील पेपर वाचता वाचता थांबले,त्यांनी मान वर केली आणि जड स्वरात म्हणाले,
"तू खूप बुद्धीमान आहेस,पोरा.तुला आपली आर्थिक परिस्थीती ठाऊकच आहे,मला पाच मुलींची लग्न करायची आहेत आणि तीन मुलांची शिक्षणं.माझी साधीशी नोकरी...तुला IIT तं पाठवणं मला नाही झेपायचं.तू म्हैसूरमध्ये राहूनच शिकायचं ते शिक ..."
आपल्या इतक्या बुद्धीमान मुलाला ह्या कारणासाठी नाही म्हणणं त्यांना फ़ारच जड गेलं,पण आपल्या मुलाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणं त्यांना भाग होतं...पण त्या काळी परिस्थीतीच अशी होती. त्या काळात मोठं कुटूंब आणि कमावता माणूस एकच असं चित्र समाजात सर्वत्र दिसून येई.
सोळा सतरा वर्षाच्या कोवळ्या मुलाची निराशा झाली.त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.IITचं स्वप्न हातात गवसेल ,असं वाटत असतानाच निसटून ते दूर गेलं.त्याचं ह्रदय वेदनेनं भरून गेलं...
अखेर तो दिवस उजाडला.त्याचे वर्गमित्र मद्रासला निघाले .तो आपल्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा निरोप घ्यायला रेल्वे स्टेशन वर गेला.सगळ्यांच्याच आनंदाला नुसतं उधाण आलं होतं...नवीन हॉस्टेल मध्ये रहाणं...नवीन अभ्यासक्रम.पण ह्या सर्वांशी त्याचा संबंध नव्हता.तो तिथे शांतपणे ऊभा होता.कोणातरी एकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तो म्हणाला ."तुला खरं तर प्रवेश मिळायला हवा होता.."
त्यावर त्याने काहीच उत्तर दिलं नाही.त्याच्या मनात राग ,द्वेष अशा भावना नव्हत्या,तो मनात स्वत:शीच विचार करत होता,"IIT मध्ये शिकून बाहेर पडलेली मुलं आयुष्यात यश मिळवतातं हे खरय.पण खरं तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून त्याला वेगळं वळण लावणं हे खरं तर कोणत्याही संस्थेच्या हातात नसून आपल्या हातात असतं..."
त्यानंतर त्याने अपार मेहनत केली.आपलं सर्व लक्ष फ़क्त ह्या गोष्टीवरच केंद्रीत केलं.आपल्याअ खाजगी आयुष्याची,आरामाची,चैनीची कशाचीही पर्वा नव्हती त्याला.त्याने आपली धनसंपत्ती इतरांच्या उपयोगात आणली.आयुष्यात त्याला वर येण्यासाठी जात ,धर्म ,राजकीय हितसंबंध इत्यादी गोष्टींची कधीच गरज भासली नाही.
एका शाळाशिक्षकाच्या मुलाने आपल्या देशबांधवांना एक गोष्ट दाखवून दिली,'माणसाला कायदेशीर मार्गाने आणि नितीधर्मांचं पालन करून संपत्ती मिळवण शक्य असतं.त्याने आपल्यासारख्याच सुस्वभावी आणि मेहनती लोकांना गोळा करून त्यांच्यासमेवत काम केलं..
भारतातील सॉफ़्टवेअर उद्योगाचा तो प्रणेता बनला.त्याने येथे इन्फ़रमेशन टेक्नोलॉजीची लाट आणली.आज तो साधेपणाचे,उत्कृष्ट्तेचे आणी न्यायतेचे प्रतीक बनला आहे.
'बुद्धीमत्तेची शक्ती आणि नीतिमूल्यांची प्रेरणा ' असं त्याच घोषवाक्य आहे.
हा मुलगा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून Infosys कंपनीचे संस्थापक आणि आत्ताचे संचालक , श्री नारायण मूर्ती....
पुस्तक--गोष्टी माणसांच्या
मूळ लेखिका -- सूधा मूर्ती
अनुवाद-- लीन सोहोनी

"व्यक्ती आणि वल्ली" .....एक प्रसंग......
नामू परीट
----------------------------------------------
कुठक्या तरी एका इंग्रजी चित्रपटाला मी आणि माझी पत्नी गेलो होतो. कुठल्याही मध्यमवर्गीयाच्या डरपोकपणाला साजेल असे वरच्या वर्गाचे तिकीट काढुन बसलो होतो. काळोखात काही वेळाने माझ्या मांडीवर कुणीतरी थापटल्याचा मला भास झाला. अंधारात मी चम्कुन बाजुला पाहीले.
"पी. यल. साहेब, पान खानार?"
आवाज ओळखीचा वाटला. चित्रपटग्रुहातल्या अंधारात काही वेळाने आपल्याला दिसू लागते. शेजारी बुशशर्ट आणि पॅंट (अर्थात दुस-याची) घालून नामूराव बसले होते. मी निमुटपणे पान घेतले.
"तंबाकू देऊ?"
"नको ---थुकायची पंचाईत होते."
"खुर्चीखाली मारा पिचकारी." नामुचा सल्ला.
"चूप!"
"शु~~~" स्मोरून कुणी तरी आवाज दिला.
"च्यायला--- डाकुमेंट्रीत काय बघायचं असतं? मेन पिक्चर इंटर्वल पडल्यावर सुरु होत."
काही वेळाने इंटर्वल झाला. नामुच्या शेजारी आमच्याच चित्रपटांतून काम करणारी, मध्यमवयाची एक्स्ट्रातंली बाई पदरविदर घेऊन मारे एखाद्या सरदारकन्ये-सारखी बसली होती. मला पाहील्यावर तिने मोठ्या थाटात नम्स्कारही ठोकला.
"वैनी , आमची फ्यामिली!"
नामुचे आमच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदात्याने आम्हाला सत्यनारायणाला बोलावले होते त्या वेळी हिने त्याची 'फ्यामिली' पाहीली होती.
"हो, कोल्हापुरला भेटलो होतो." आमची बायकोही नामूला नको त्या सभ्य पातळीवर आणीत म्हणाली.
"ती निराळी-- ही ष्टेपनी."
कुठेही संकोचाचा लवलेश स्पर्श नाही. मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी संकोचलो.
"नामू--" मी उगीच विषय बदलीत म्ह्टले, "इंग्लिश पिक्चरमध्ये काय समजतं रे तुला?"
"फुकट पास आहे !"
"ह्याही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं?"
"नाही, डोरकीपरचे! साहेब, पण पिक्चर झकास आहे. लवशिन काय काय घातले आहेत. ट्रॉली निस्ती गार गार फिरवली आहे."
माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि पिक्चर सुरू झाला.
------------------------------------------------------------

चितळे मास्तर
------------------------------------------
एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.
"हं, गोदाक्का, सांगा वारा कुठल्या दिशेला वाहतोय?"
"गोदाक्का, वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?" गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच ढुप्प करून बसलेली. "कार्टे, बूड हलवून उभी राहा की जरा. आश्शी!" अगदी मॅट्रीकपर्येतच्या मुलीलादेखील 'बूड' हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढुन शुंभासारखी उभी राहायची.
"हां, सांगा आता, कुठले वारे वाहताहेत?" मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प.
"गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ--डोंगराच्या की समुद्राच्या? राम्या तु सांग."
मग गोगट्यांच्या राम्या बिनदिक्कत गोदीला म्हणाला होता, "ए गोदे, नीट उभी राहा की--"
"का रे राम्या?" मास्तर दटावायचे.
"मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?"
"तिचा पदर कशाला दिसायला हवा?"
"मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कसं?"
"भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?" अरे. दिवसा वाहतात ते लॅंड विंड्स की सी विंड्स?"
मग सगळ्या वर्गाकडुन "दिवसा वाहतात ते--" ह्या चालीवर पाचपंचवीस वेळा घोकंपट्टी व्हायची. आणी मग "गोदीच्या पदराचा आणि लॅंड विंड्सचा संबंध.....?"
"ना~~~~ही!" पोरे ओरडायची.

Saturday, November 27, 2010
आळशी माणसं खुप हुशार असतात....
"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.
आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.
ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे.
हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात.
आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर.
ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे.
पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?

Thursday, November 25, 2010
पार्टनर- व.पु. काळे
"प्रिय पार्टनर,
समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फुलाला उलकत नाही.
एवढास्सा तू.
त्याहून एवढास्सा मी.
मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस? आणि त्यापेक्षाही, संभोगाचा अर्थ लावायचा असतो असं तुला कोणी सांगितले?"
पाणी म्हणजे एच टू ओ.
इथंच सगळे थांबले आहेत. मूर्ख म्हणून नव्हेत, तर जाणकार म्हणून थांबले. पृथःकरण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणून.
कोणता आनंद क्षणजीवी नाही ?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो, तोवर 'चव'. खाली उतरला की 'घास'. सुगंधाचं नातं नाकाशी, घशातून आत गेल्यावर फक्त 'हवा'. खर तर सगळ्या पंचेद्रियांच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली. इतर अनेक गरजांपैकी तृप्ती ही गरज आहे. जो गरजू आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो. व्यवहार नेहमीच साधतो असं नाही.
तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते, त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच, वर्तमानकाळ संभाळ !
Present tense is the only tense, it takes care of past & future, we look at it in correct prosspective.
तुज्यापेक्षा किरण जास्त भाग्यवान असेल, असं मला वाटतं. तू जागा राहिलास ह्याचा अर्थ ती गाढ झोपलेली असणार. लक्षात ठेव, तिला आयुष्य समजेल अथवा कधीच समजनार नाही. पण तुज्यापेक्षा ती नक्कीच सुखी होईल.
There is no single example of Happy Philosopher.
म्हणून हात जोडून विनंती करतो, Don't be a philosopherJust be a Kiran's husband.
तुझा,
पार्टनर. "

Wednesday, November 24, 2010
भोवतीच्या जगात................
भोवतीच्या जगात
आपल्याच मनाच प्रतिबिंब
आपण शोधत रहातो
कसल्याशा नजरेनं...
कधी जगाचा वेध
सारं जग स्वतःमधे सामवून घेत
तर कधी जगाच्या पलिकडे
स्वतःच्याच अस्तित्वाच क्षितीज न्याहाळत....
अशाच तंद्रीच्या वेळी
मनाच अभाळ आशयघन होऊन
भरुन येवू लागतं.
जिवाची घालमेल असह्य होते
क्षितीजावर तेव्हा शब्दांची नक्षत्रे फ़ेर धरू लागतात
आणि हलकेच झरू लागतात
मनाचे आरस्पानी थेंब ...........

Friday, November 19, 2010
फुले शिकवतात......
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं
Thursday, November 18, 2010
तुझी आठवण येताच.........
तुझी आठवण येताच
खुलतं ओठांवर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू
लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन् पापण्याही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं
उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा
जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर
दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात ही गात्रं
खुलतं ओठांवर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू
लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन् पापण्याही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं
उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा
जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर
दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात ही गात्रं
अजुनही आठवतयं मला.....
अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."
अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते बेडकाच पोहणं
त्याला हुश्श करून म्हणायचीस..
"बेडका, पाण्याचा ठाव कुठे आहे सांग ना मला"..
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"
अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.

Tuesday, November 9, 2010
गोष्ट गोष्ट गोठाडी
गोष्ट गोष्ट गोठाडी
कुम्भार मडके ठोठावी
मडके केले मातीचे
पाणी आणले विहीरीचे
पाणी झाले गार गार
मुले प्यायली फार फार
घसा लागला दुखायला
डौक्टर आले बघायला
औषध दिले कडु कडु
मुलाना आले फारच रडु
चौकलेट दिले खायाला
मुले लागली हसायला....
कुम्भार मडके ठोठावी
मडके केले मातीचे
पाणी आणले विहीरीचे
पाणी झाले गार गार
मुले प्यायली फार फार
घसा लागला दुखायला
डौक्टर आले बघायला
औषध दिले कडु कडु
मुलाना आले फारच रडु
चौकलेट दिले खायाला
मुले लागली हसायला....
निज रे निज रे बाळा
निज रे निज रे बाळा, रडू नको लडिवाळा,
दारी बागुलबुवा आला........
बागुलबुवाचे, बुवाचे रुप किती अनिवार,
मस्तकी जटान्चा भार........
आल्या पुण्याच्या, पुण्याच्या गोसावीनी,
कुणी घ्या ग बाळाला द्रुष्ट्मणी.
द्रुष्ट्मण्याचा, मण्याचा झाला पाणी.........
बाळ खेळ्तो फुलावानी.
निज रे निज रे बाळा, रडू नको लडिवाळा

Thursday, July 22, 2010
आठवून पाहायचो मी काही पावसाळे..................

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .
आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .
जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .
आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .
दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"
Subscribe to:
Posts (Atom)