तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
माझ्या ओठांवर आज
आठवांची गाणी
एक क्षण तुझा
एक क्षण माझा
त्या नाजूक क्षणांची
बाकी राहिली देणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक डाव तुझा
एक डाव माझा
त्या आपल्या खेळाची
अधुरी कहाणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक स्वप्न तुझं
एक स्वप्न माझं
त्या गुलाबी स्वप्नांची
भंगलेली लेणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
एक सूर तुझा
एक सूर माझा
त्या गंधर्व गीताची
झालीय विराणी
तुझ्या डोळ्यात पाणी
माझ्या डोळ्यात पाणी
.......Orkut
मराठी साहित्य हा माझ्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. या अनुदिनीद्वारे मराठीतील लेखक वा कवींच्या साहित्यकृतींचा - मग त्यात पुस्तके, लेख, कविता, नाटके, भाषणे, समीक्षा, नाट्यछटा सारे आले; मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न राहील.
Tuesday, May 13, 2008
Tuesday, May 6, 2008
फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले ,
धावत आठवणींच्या पाठीसबंध आयुष्य वाट पाहत ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्या येण्याची वाट पाहत ,
शब्द गोठले आज ओठीमनात दुखाचे भास कळवले,
मी फक्त तुझ्या साठीजगलो असा की मी ,
जगणे राहून गेले पाठीडोल्यातील अश्रू मनात कोंडाले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझ्यासमोर झुकते मन ,
हे मन ही आहे फार हाटीयाच हा टी मुळे आयुष्य बेतले,
मी फक्त तुझ्याचसाठीनशीबाची झगडत झगडत ,
न तोडता प्रेमाची गाठहीत्या गाठही संभाळुन ठेवली,
मी फक्त तुझ्यासाठीएक एक क्षण तुझ्या प्रेमाचा ,
आज डोळ्यात दातित्या क्षणाना उराशि कवतावले ,
मी फक्त तुझ्यासाठीअंधार विजत उजेड यावा ,
भान विसरून जुलावी मिठीयाच स्वप्नं ना आयुष्य समजले ,
मी फक्त तुझ्यासाठीतुझीच वाट पाहत ,
जळाले मन प्रेमसाठीभिन्न दिशाना झुरत राहिलो,
मी फक्त तुझ्यासाठी

Subscribe to:
Posts (Atom)