Thursday, November 18, 2010

तुझी आठवण येताच.........

तुझी आठवण येताच
खुलतं ओठांवर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू

लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन् पापण्याही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं

उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा

जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर

दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात ही गात्रं

No comments: